ज्‍येष्ठ नागरिक स्मार्ट कार्डपासून वंचित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्‍येष्ठ नागरिक स्मार्ट कार्डपासून वंचित
ज्‍येष्ठ नागरिक स्मार्ट कार्डपासून वंचित

ज्‍येष्ठ नागरिक स्मार्ट कार्डपासून वंचित

sakal_logo
By

चेंबूर, ता. ४ (बातमीदार) ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य परिवहन महामंडळातर्फे ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली आहे. मात्र कुर्ला आगारात ही स्मार्ट कार्ड वितरण सेवा तांत्रिक अडचणीमुळे गेल्या कित्येक दिवसांपासून बंद आहे. यामुळे ज्‍येष्ठ नागरिकांना हे कार्ड मिळविण्याकरीता वणवण भटकण्याची वेळ आली आहे.
राज्य परिवहन सेवेत ज्‍येष्ठ नागरिकांना पूर्वी प्रवासात एकूण ५० टक्के सवलत मिळत होती. या वर्षी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत मिळणार असल्याची घोषणा केली होती. याकरीता एसटी आगरातून स्‍मार्ट कार्ड दिले जात आहेत. हे कार्ड घेण्याकरीता चेंबूर, कुर्ला, गोवंडी, सायन, घाटकोपर, भांडुप, मुलुंड अशा विविध भागांतील ज्‍येष्ठ नागरिक कुर्ला नेहरूनगर आगारात येतात. मात्र सध्या या आगारातील संबंधित अधिकारी यांनी ज्‍येष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड वितरण सेवा तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे, असा मोठा फलक लावला आहे. या आगारात नाही तर दुसऱ्या तरी आगारात आपल्याला स्मार्ट कार्ड मिळेल या आशेवर ज्‍येष्ठ नागरिक अन्य आगारांत जात आहेत.
कुर्ला आगारातील तांत्रिक अडचण लवकरात लवकर दूर करून ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र जाधव यांनी केली आहे. येत्या काही दिवसांत हे वितरण सुरू न झाल्‍यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्‍यांनी दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95591 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..