टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू
टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू

टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : नेरूळ येथून जुईनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव टेम्पोने समोरून येणाऱ्या स्कुटीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू; तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी जुईनगर रेल्वे स्टेशनसमोर घडली. याप्रकरणी नेरूळ पोलिसांनी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.
वाशी, सेक्टर-६ मध्ये राहणारी निरल चांद्रा (२३) हिचा अपघातात मृत्यू झाला आहे; तर ठाण्यातील वागळे इस्टेट भागात राहणारा अविनाश उपाध्याय (२३) हा जखमी आहे. हे दोघेही एकाच कंपनीत कामाला होते. सुट्टी असल्याने शुक्रवारी सायंकाळी ४ च्या सुमारास स्कुटीवरून फिरण्यासाठी निघाले होते. मुसळधार पाऊस कोसळत असताना सानपाडा येथून जुईनगर रेल्वे स्टेशनसमोरील सर्व्हिस रोडने नेरूळच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या टेम्पोने स्कुटीला समोरून धडक दिली. या अपघातात स्कुटीवरील निरल व अविनाश हे दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र निरलला मृत घोषित केले; तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या अविनाश उपाध्याय याच्यावर नेरूळमधील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी नेरूळ पोलिसांनी टेम्पोचालक संतोष पाटील (४५) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95595 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..