‘एक गाव एक गणपती’ उर्से गावात सुवर्ण महोत्सवी वर्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एक गाव एक गणपती’ उर्से गावात सुवर्ण महोत्सवी वर्ष
‘एक गाव एक गणपती’ उर्से गावात सुवर्ण महोत्सवी वर्ष

‘एक गाव एक गणपती’ उर्से गावात सुवर्ण महोत्सवी वर्ष

sakal_logo
By

कासा, ता. ४ (बातमीदार) : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. सर्वजण बाप्पाची भक्तिभावाने घराघरांत आराधना करत असले तरी पालघरमधील एक गाव असे आहे जिथे मागील ५० वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवली जात आहे. त्या गावाचे नाव उर्से असे असून यंदा मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा केला जात आहे.
पालघरमधील सूर्या नदीच्या काठावर आणि डोंगराच्या कुशीत वसलेले उर्से हे गाव आहे. गावातील लोकसंख्या जवळपास अडीच हजारांच्या घरात आहे. गावातील एकोपा आणि ऐक्य कायम राहावे यासाठी १९७३ साली या गावातील नागरिकांनी एकत्र येत धनंजय कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाची स्थापना करून सार्वजनिक गौरी व गणेशोत्सवाला सुरुवात केली. तेव्हापासून या गावात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवली जाते. गणेशोत्सवासह प्रत्येक सण हा ‘एक गाव एक उत्सव’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी ‘एक गाव एक गणपती’चा उर्से गावातील सुवर्णमहोत्सवी वर्ष असून या निमित्ताने गावात विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशीच नोकरी-धंद्यानिमित्त शहरांमध्ये राहणारे गावातील नागरिक, तरुण उर्से गावात दाखल होतात. बाप्पांच्या आगमनानंतर पाच दिवस गावात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
....
कोट
आपल्या बाप्पाची मूर्ती आणि सजावट आकर्षक आणि भव्य असावी यासाठी सुरू असलेली चढाओढ आपण पाहतो. मात्र या चढाओढीत कुठेही भाग न घेता उर्से गावाने आपली ‘एक गाव एक गणपती’ ही परंपरा कायम ठेवली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव ज्या उद्देशाने सुरू करण्यात आला तो उद्देश आजही डोळ्यांसमोर कायम ठेवून उर्से गाव समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करत आहे.
- सुवर्णा पाटील, गृहिणी उर्से

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95602 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..