हात प्रत्यारोपण झालेल्या मोनिकाने केली बाप्पाची आरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हात प्रत्यारोपण झालेल्या मोनिकाने केली बाप्पाची आरती
हात प्रत्यारोपण झालेल्या मोनिकाने केली बाप्पाची आरती

हात प्रत्यारोपण झालेल्या मोनिकाने केली बाप्पाची आरती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : धैर्य आणि ताकदीसह आशेचा किरण पुन्हा एकदा मोनिका मोरेला दिसू लागला आहे. प्रत्यारोपणानंतर पूर्णपणे बरी झालेल्या मोनिकाला पहिल्यांदाच लालबागच्या राजाच्या दरबारात महाआरती करता आली. या महाआरतीबरोबरच मोनिका बाप्पाच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाली आणि तिने बाप्पाचे आशीर्वाद घेतले.

२०१४ मध्ये घाटकोपर येथे झालेल्या रेल्वे अपघातात मोनिका मोरेने आपले दोन्ही हात गमावले होते. त्या वेळी ती २३ वर्षांची होती. मोनिका जवळजवळ ६ वर्षे हातांशिवाय राहिली. शेवटी ऑगस्ट २०२० मध्ये, तिच्यावर ग्लोबल रुग्णालयात मेंदूमृत रुग्णाचे हात प्रत्यारोपण करण्यात आले. हाताचे प्रत्यारोपण करणारे डॉ. नीलेश सातभाई यांनी सांगितले की, शस्त्रक्रियेपासून तिची फिजिओथेरपी सुरू आहे. मोनिकाच्या हाताचे प्रत्यारोपण होऊन आता दोन वर्षे झाली आहेत. मोनिका आता प्रत्यारोपणातून पूर्णपणे बरी झाली आहे. स्वतःच्या हातांनी मोनिका नियमित कामे करू शकते. महाआरतीचा आनंद व्यक्त करताना मोनिका मोरे म्हणाली की, लालबागच्या राजाच्या दरबारात महाआरती करू शकेन, याची कल्पनाही केली नव्हती; पण माझे हे स्वप्नही पूर्ण झाले आहे. माझ्या कुटुंबाने मला पाठिंबा दिला. मला प्रोत्साहन दिले. याच प्रोत्साहनामुळे आज मी बाप्पाच्या दरबारात उभी आहे. लोकांना माझ्यापासून प्रेरणा मिळते, यातच मला समाधान आहे.
.....................
मोनिका गेल्या वर्षभरापासून आपल्या कुटुंबालाही हातभार लावते आहे. ग्लोबल रुग्णालयात ती पेशंट केअर कॉर्डिनेटर म्हणून काम करते. रुग्णांच्या काळजीसह त्यांना सुविधा पुरवण्यासाठी मोनिका कार्यरत आहे. ३० ऑगस्टला तिच्या या कार्याला एक वर्ष पूर्ण झाले. दररोज घाटकोपर ते परळ असा टॅक्सीतून प्रवास करत मोनिका रुग्णालयात दाखल होते. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत काम करत असताना ग्लोबल रुग्णालयाचा प्रत्येक कर्मचारी मोनिकाची काळजी घेतो, अशी माहिती मोनिका मोरे हिने दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95603 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..