जुन्या पेन्शनसाठी संघटना आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्या पेन्शनसाठी संघटना आक्रमक
जुन्या पेन्शनसाठी संघटना आक्रमक

जुन्या पेन्शनसाठी संघटना आक्रमक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : झारखंडसारख्या राज्याने आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केल्यानंतर आता महाराष्ट्रातील शिंदे- फडणवीस सरकार असा निर्णय कधी घेणार, असा सवाल आता राज्यातील कर्मचारीवर्गातून उपस्थित होत आहे. आता जर सरकारने संवेदनशीलता दाखवून तत्काळ जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेतला नाही, तर येणाऱ्या दिवसांत कर्मचाऱ्यांच्या मोठ्या रोषाला समोरे जावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेकडून देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात गेल्या सात वर्षांपासून जुन्या पेन्शनची कर्मचारी मागणी करीत आहेत. बऱ्याचदा आंदोलने आणि संपही केले; परंतु प्रत्येक वेळी सरकारकडून व नेत्यांकडून फक्त आश्वासने मिळाली आहेत. महाराष्ट्र सरकारने १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना नवीन अंशदान पेन्शन योजना लागू केली. त्या वेळी अतिशय गाजावाजा करून कर्मचाऱ्यांसाठी चांगली योजना आहे, असा सरकारने प्रचार, प्रसार केला; पण प्रत्यक्षात मात्र ही योजना फसवी असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने या योजनेत सरकारने कर्मचाऱ्यांची कशी फसवणूक केली, हे प्रमाण दाखवून दिले आहे. तब्बल १५ वर्षे या योजनेत पैसे कपात केल्यानंतर सरकार याचा साधा हिशेबही देऊ शकले नाही आणि आता एनपीएसमध्ये वर्ग करण्याचा आत्मघातकी निर्णय सरकारने घेतला आहे. थोडक्यात काय सरकारने कोणतीही पूर्वतयारी न करता, नियोजन न करता कर्मचारी बांधवांचे आयुष्य धोक्यात आणल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनाकडून करण्यात आला आहे.
..
झारखंडसारखे राज्य जर जुनी पेन्शन लागू करू शकते, तर महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य का नाही? महाराष्ट्र सरकारने जुन्या पेन्शनचा निर्णय घ्यावा व राज्यातील पाच लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा येत्या काळात कर्मचारी आपला संघर्ष अधिक तीव्र करतील.
- वितेश खांडेकर, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना
...
जुनी पेन्शन लागू करणारी राज्ये
- मे २०२२ मध्ये राजस्थान व छत्तीसगढ सरकारने जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू केली,
- पश्चिम बंगाल राज्यात सुरुवातीपासून जुनीच पेन्शन योजना लागू आहे.
- जुनी पेन्शन लागू करणारे झारखंड हे आता चोथे राज्य बनले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95609 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..