चिंचोटी कोल्ही स्मशानभूमी दुरावस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचोटी कोल्ही स्मशानभूमी दुरावस्था
चिंचोटी कोल्ही स्मशानभूमी दुरावस्था

चिंचोटी कोल्ही स्मशानभूमी दुरावस्था

sakal_logo
By

विरार, ता. ४ (बातमीदार) : वसई पूर्वेतील चिंचोटी कोल्ही नाका स्मशानभूमीची बिकट अवस्था झाली आहे. याच्या दुरुस्तीकडे पालिकेने दुर्लक्ष केले असल्याने स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत पालिका प्रशासनाने लवकरच स्मशानभूमीची पाहणी करून आवश्यक त्या उपाय योजना करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
वसई पूर्वेतील महामार्गालगत कोल्ही- चिंचोटी परिसर आहे. या परिसरातील नागरिकांना अंत्यविधीसाठी स्मशानभूमी तयार केली आहे; परंतु या स्मशानभूमीची देखभाल दुरुस्ती योग्यरीत्या केली जात नसल्याने स्मशानभूमीची अवस्था बिकट बनली आहे. या स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, यासाठी अनेकदा पालिकेकडे तक्रार केली आहे.
====================================================
या स्मशानभूमीची पालिकेच्या अभियंत्यामार्फत पाहणी करण्यात येणार असून, याअंतर्गत ज्या दुरुस्त्या असतील त्या करण्यात येतील.
- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई विरार महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95615 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..