छप्पराअभावी उघड्यावर अंत्यसंस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छप्पराअभावी उघड्यावर अंत्यसंस्कार
छप्पराअभावी उघड्यावर अंत्यसंस्कार

छप्पराअभावी उघड्यावर अंत्यसंस्कार

sakal_logo
By

मनोर, ता. ४ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील केव गावात स्मशानभूमी तर आहे; परंतु स्मशानभूमीवर छप्परच नाही, अशी अवस्था आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादळात केव गावाच्या स्मशानभूमीचे छप्पर उडून गेले होते. पण स्मशानभूमीच्या छताचे पत्रे बसवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे छताच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
विक्रमगड तालुक्यातील केव-नालशेत-शीलशेत ग्रामपंचायत हद्दीतील केव गावासाठी केव फाटा-म्हसरोळी रस्त्यावरच्या नाल्यालगत स्मशानभूमी बांधण्यात आली होती. सहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीमार्फत स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले होते. नाल्याच्या दोन्ही बाजूंनी केव आणि शीलशेत गावासाठी दोन स्मशानभूमी बांधण्यात आल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी आलेल्या तौक्ते वादळाच्या तडाख्यात दोन्ही स्मशानभूमीच्या छपराचे पत्रे उडून गेले होते. वादळानंतरच्या दोन वर्षांच्या कालावधीत दोन्ही स्मशानभूमीच्या छताचे पत्रे बसवण्यासाठी ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ऑगस्ट महिन्याच्या २१ तारखेला केव गावातील वयोवृद्ध महिला भीमा भीमराव शेलार यांचा मृत्यू झाला होता. पाऊस सुरू असल्याने ग्रामस्थांना त्यांच्या मृतदेहावर भरपावसात अंत्यसंस्कार करावे लागले होते. त्यामुळे दोन्ही स्मशानभूमीवरील छताचे पत्रे तात्काळ बसवून ग्रामस्थांना होत असलेली गैरसोय दूर करण्याची मागणी केली जात आहे.
स्मशानभूमीसंबंधी माहिती घेण्यासाठी केव नालशेत शिलशेत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गणेश मंडळ यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

प्रतिक्रिया
केव गावाच्या स्मशानभूमीबाबत माहिती घेऊन ग्रामसेवकाला योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले जातील.
- हणमंतराव दोडके, गटविकास अधिकारी, विक्रमगड.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95621 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..