न्यूझिलंडमध्‍ये सार्वजनिक गणपती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यूझिलंडमध्‍ये सार्वजनिक गणपती
न्यूझिलंडमध्‍ये सार्वजनिक गणपती

न्यूझिलंडमध्‍ये सार्वजनिक गणपती

sakal_logo
By

मुलुंड, ता. ४ (बातमीदार) ः मुलुंड पूर्व येथे राहणारे आनंद नूलकर आणि त्यांची वास्तुविशारद पत्नी निकिता नूलकर यांनी व त्यांच्या मुंबईमधील मित्र परिवारांनी न्यूझीलंडमध्ये सार्वजनिक गणपतीची स्थापना केली आहे. न्यूझीलंडमधील न्यू प्लाय माऊथ या गावातील अष्टविनायक ग्रुपतर्फे गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत. अतिशय कलात्मक पद्धतीने मुंबईतील चाळीचा देखावा येथील युवक- युवतींनी उभा केला आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांतील २० कुटुंबे न्यूझीलंडमधील न्यू प्लाय माऊथ येथे नोकरी-व्यवसायानिमित्ताने स्थायिक आहेत. गणपतीची मिरवणूक, पारंपरिक वेशभूषा, महाराष्ट्रीयन पदार्थांच्या प्रसादाची रेलचेल, सांस्‍कृतिक कार्यक्रम यामुळे एक छोटा महाराष्ट्र येथे उभारला गेल्याचे वातावरण आहे. मागील ५ वर्षांपासून हा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. याशिवाय इतर सर्व भारतीय सणदेखील एकत्र साजरे केले जात आहेत. गणेशोत्सवात अमोल ठाकरे, प्रतीक पवार, राजू खाडिलकर, महेंद्र परदेशी, प्रतीक भावसार, अमित चिटणीस, हितेश पाटील, प्रशांत मोरे, अमरीश खानोलकर, किशोर ओढेकर, यश जोशी, साई राणे, करण लोखरे, रोहिणी राव आदींचा सहभाग असतो.

प्रतिकात्‍मक विसर्जन
न्यूझीलंडमध्ये गणेशमूर्तीच्या विसर्जनाला बंदी आहे. परिणामी दरवर्षी एकाच ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवण्यात येते. मात्र विसर्जन प्रतिकात्मक रितीने केले जाते. गणेशाच्या मूर्तीऐवजी सुपारीचे विसर्जन केले जाते. विशेष म्हणजे गणपतीची शाडूची मूर्ती मुंबईवरून मागविली असून त्याच मूर्तीची पूजा गेल्या पाच वर्षांपासून केली जात आहे.

न्यूझीलंडमध्ये गणेशोत्सवासाठी हॉल मिळणे कठीण आहे. परिणामी आम्ही दरवर्षी कारच्या गॅरेजमध्ये गणपती बसवितो. एकूण पाच दिवस येथे गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. रोज सायंकाळी भजन, नृत्य, लोकगीत आणि पारंपरिक वेशभूषा आदी कार्यक्रमांची रेलचेल असते. दरवर्षी गणेशोत्सव नव्या संकल्पनेने साजरा केला जातो.
- आनंद नूलकर

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95622 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..