सराईत चोरांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सराईत चोरांना अटक
सराईत चोरांना अटक

सराईत चोरांना अटक

sakal_logo
By

मानखुर्द, ता. ४ (बातमीदार) ः ट्रॉम्बे पोलिसांनी रोशन चौहान ऊर्फ गोलू व सुलतान शेख या चोरांना नुकतीच अटक केली. त्यापैकी सुलतान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात तब्बल २१ गुन्ह्यांची नोंद आहे. त्याला याआधी हद्दपार करण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र धोकादायक कारवाया प्रतिबंधक १९८१ कायद्यांतर्गत दोन वेळा स्थानबद्धदेखील करण्यात आले होते.
सिगरेट सेल्समन म्हणून काम करत असलेले अब्दुल सय्यद हे मागील महिन्यात चेंबूरच्या पंजाब वाडी सिग्नलजवळ वितरणासाठी आणलेल्या सिगारेटसह सायकल उभी करून जवळच्या दुकानावर गेले होते. त्या वेळी रोशन व सुलतानने त्यांच्या सायकलवर ठेवलेल्या सुमारे ७८ हजार रुपये किमतीच्या सिगारेट्‌स लंपास केल्या होत्या. अब्दुल यांनी याविषयी ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार उपनिरीक्षक शरद नानेकर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकासह तपासाला सुरुवात केली. त्यांनी ट्रॉम्बेसह गोवंडी, चेंबूर, आरसीएफ, सायन, भोईवाडा व काळाचौकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ९० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चोरांची ओळख पटवली. त्यांची माहिती खबऱ्यांच्या तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकांकडे दिली. त्यातील आरोपी रोशन हा आगरीपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याचे कळले. त्या ठिकाणाहून त्याला मागील महिन्यात अटक करण्यात आली. त्यानंतर त्याचा साथीदार सुलतान याला रविवारी पहाटे तीन वाजता आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहाच्या मागून अटक केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95624 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..