अमृतमहोत्सवानिमित्त भारतीय सैनिकांना देखाव्यातून मानवंदना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमृतमहोत्सवानिमित्त भारतीय सैनिकांना देखाव्यातून मानवंदना
अमृतमहोत्सवानिमित्त भारतीय सैनिकांना देखाव्यातून मानवंदना

अमृतमहोत्सवानिमित्त भारतीय सैनिकांना देखाव्यातून मानवंदना

sakal_logo
By

बदलापूर, ता. ४ (बातमीदार) : यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर बदलापूरजवळील दहिवली गावातील मगर कुटुंबाने भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यासाठी व त्यांचा त्याग, समर्पण समाजासमोर ठेवण्यासाठी घरातील गणपतीच्या आरासात ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देखावा सादर केला आहे.

बदलापूरपासून कोंडेश्वर मार्गावर दहिवली गावात संतोष मगर यांच्या कुटुंबीयांकडे परंपरेने गेल्या ५३ वर्षांपासून गणपती व गौरीचे आगमन होते. दरवर्षी मगर कुटुंबीय गौरी गणपतीच्या आरासात वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर आधारित देखावे सादर करत आले आहेत. यात किल्ल्यांची होत असलेली पडझड बघून त्यासंदर्भात देखावा, २०१८ मध्ये अतिवृष्टी होऊन वांगणीजवळ अडकलेली महालक्ष्मी एक्स्प्रेस यांसारखे विषयसुद्धा मगर कुटुंबीयांनी देखाव्यातून सादर केले आहे. मात्र यंदा देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने मगर कुटुंबाने यंदाच्या देखाव्यातून देशाच्या रक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या भारतीय सैनिकांचे कार्य व त्यांचे समर्पण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95630 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..