कांजूरगावात निसर्गाच्या सानिध्यात पर्यावरणपूरक बाप्पा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांजूरगावात निसर्गाच्या सानिध्यात पर्यावरणपूरक बाप्पा
कांजूरगावात निसर्गाच्या सानिध्यात पर्यावरणपूरक बाप्पा

कांजूरगावात निसर्गाच्या सानिध्यात पर्यावरणपूरक बाप्पा

sakal_logo
By

भांडुप, ता. ४ (बातमीदार) ः काय झाडी, काय डोंगार, काय हाटील सगळंच कस एकदम ओके ओके आहे. हे वाक्य विद्यमान सरकारच्या काळात प्रसिद्ध झाले. या गंमतीदार वाक्याला अनुसरून निसर्गरम्य असा देखावा गणेशोत्सवानिमित्त गणेश मूर्तीच्या भोवती कांजूरगाव पूर्व येथील नागेश बळीराम इंगळे यांच्या घरी साकारण्यात आला आहे.
या देखव्याच्या सजावटीत हॅन्ड मेड कागद, कापड, पुठ्ठे, वर्तमानपत्र, संपूर्ण शाडू मातीची श्री गणरायाची मूर्ती, खळखळणारा धबधबा, आकाशात विहार करणारे पक्षी, नाचणारे मोर अशा प्रकारचा ईको-फ्रेन्डली देखावा कांजुरगाव पूर्व विभागातील प्रसिद्ध सजावटकार आकाश राजू येडे यांनी साकारला आहे. यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागला आहे. या देखव्यातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घरगुती गणपती सजावट असली, तरी भाविकांची देखावा पाहण्यासाठी व बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी इंगळे यांच्या घरी होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95634 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..