केवायसी करण्याचे तहसील कार्यालयाचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केवायसी करण्याचे तहसील कार्यालयाचे आवाहन
केवायसी करण्याचे तहसील कार्यालयाचे आवाहन

केवायसी करण्याचे तहसील कार्यालयाचे आवाहन

sakal_logo
By

जव्हार (बातमीदार) : तालुक्यातील पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ दिला जात आहे, यात आणखी पारदर्शकता यावी, म्हणून सर्व पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार आशा तामखडे यांनी केले आहे. ई-केवायसी करताना, पी. एम. किसान लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय, आपले सरकार सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र आदी ठिकाणी जाऊन ई-केवायसी उद्या (ता. ७) पर्यंत अपडेट करून घेणे बंधनकारक आहे. मुदतीच्या तारखेनंतर, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नसेल, त्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा यापुढील लाभ मिळणार नाही, असे केंद्र सरकारचे निर्देश आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95662 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..