२ ऑक्टोबरच्या रेल्वे आंदोलनावर ठाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२ ऑक्टोबरच्या रेल्वे आंदोलनावर ठाम
२ ऑक्टोबरच्या रेल्वे आंदोलनावर ठाम

२ ऑक्टोबरच्या रेल्वे आंदोलनावर ठाम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ ः एसी लोकलच्या प्रवासी संख्येत सातपट वाढ झाल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला असला, तरीही साध्या लोकलच्या वेळापत्रकात होणारा बदल आणि सामान्य चाकरमान्यांचा खोळंबा सहन करणार नाही. जर वेळीच रेल्वे मंत्रालयाने याबाबत ठोस निर्णय घेतला नाही, तर येत्या दोन ऑक्टोबरला नियोजित रेल्वे दांडीमार्च काढण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. यासाठी लवकरच रेल्वे प्रवासी परिषदेचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रविवारी (ता. ४) रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी मुंब्रा रेल्वे स्थानकात डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस शेकडो रेल्वे प्रवासी उपस्थित होते. या बैठकीच्या अनुषंगाने रेल्वेने मोठा फौजफाटा तैनात केला होता. बंदुका रोखलेल्या पोलिसांना पाहून डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. बंदुका बाजूला ठेऊन पोलिसांना बंदोबस्त पुरवण्याचे आवाहन केले. त्यानुसार पोलिसांनीही शस्त्र बाजूला ठेऊन बंदोबस्त पुरवला. या बैठकीत प्रवाशांनी आपल्या समस्या मांडल्या.
एसी लोकलच्या विरोधात लढा कळव्यातून सुरू झाला. त्यानंतर बदलापुरातही आंदोलन झाले. ही समस्या फक्त कळवा, मुंब्रा येथील रहिवाशांची नाही; तर ही समस्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्व प्रवाशांची आहे. आजमितीला कळवा, मुंब्रा येथे थांबणाऱ्या सुमारे २१ सेमीफास्ट लोकल थांबणे बंद करण्यात आले आहे. जर एवढ्या लोकल बंद केल्या, तर त्यामध्ये चढणारा प्रवासी जाणार कुठे? तो खचाखच भरलेल्या गाडीत चढला अन् पडून दगावला, तर त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न आव्हाड यांनी विचारला. आमची लढाई माणसाला जगवण्यासाठी आहे, असेही ते म्हणाले.
-----
साध्या लोकलचा खोळंबा का?
या बैठकीदरम्यान एका प्रवाशाने एसी लोकल सुरू करण्याची मागणी केली. त्यावर डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आपला एसी लोकलला विरोध नाही; पण सामान्यांना परवडणाऱ्या साध्या लोकलच्या वेळेत जर एसी लोकल चालवल्या जात असतील आणि साध्या लोकल उशिरा धावणार असतील, तर त्यास आमचा विरोध आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95683 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..