मतमतांतरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतमतांतरे
मतमतांतरे

मतमतांतरे

sakal_logo
By

विचार खुंटावर?
शिवसेनेत फूट पडल्यावर बाळासाहेबांच्या विचारांवर शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात चढाओढ दिसत असून उद्धव ठाकरे यांना दररोज डिवचण्याचा उद्योग सुरू आहे. तिकडे कॉंग्रेसकडून राहुल गांधींचे मांडीवर बसलेल्या मुलासारखे लाड केले जात आहेत, तर भाजप सत्तेचा वापर विरोधकांना नामशेष करण्यासाठी करत आहे. थोडक्यात सर्वपक्षीय नेते चांगल्या विचारांपासून दूर गेले आहेत. या नेत्यांनी आपल्या जुन्या नेत्यांच्या विचारापासून दूर जाऊन त्यांचे विचार खुंटीला टांगले आहेत.
- अरुण बधान, डोंबिवली
---
केंद्राचा योग्य निर्णय
जन्मानंतर लगेचच एखाद्या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे होणारे संभाव्य भावनिक आघात लक्षात घेऊन महिला कर्मचाऱ्यांना ६० दिवसांची विशेष प्रसूती रजा देण्यात येणार आहे. याबाबतचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि भावनांचा विचार करत प्रसूती रजेसंबंधी नियमावलीत मोठा बदल केला आहे. बालकांच्या मृत्यूनंतर आईच्या मनःस्थितीचा विचार करता ही विशेष प्रसूती रजा गरजेची आहे. या रजेमुळे महिला कर्मचाऱ्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास निश्चित मदत होईल. अशा घटनेनंतर सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्‍यांना पितृत्व रजेचा लाभ घेता येणार आहे का ? येत्या काळात राज्य सरकारी, खाजगी कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांनाही अशाच विशेष रजेची तरतूद केल्यास नक्कीच सरकारचा हा निर्णय सर्वसमावेशक व कल्याणकारी ठरेल.
- विवेक तवटे, कळवा

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95690 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..