बालसुधारगृहातून पळालेला अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालसुधारगृहातून पळालेला अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात
बालसुधारगृहातून पळालेला अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

बालसुधारगृहातून पळालेला अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : बालसुधारगृहातून पळून गेलेल्या अल्पवयीन आरोपीला काही वेळातच पकडण्यात पोलिसांना यश आले. मानखुर्द येथील बालसुधारगृहातून हा अल्पवयीन आरोपी शनिवारी (ता.३) पळाला होता. मध्य प्रदेशात चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आरोपीला मध्य प्रदेशातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील बालसुधारगृहात या १७ वर्षीय आरोपीला ठेवण्यात आले होते. तेथून पळून जाऊन तो मुंबईतील मानखुर्द येथे आला होता. पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला ताब्यात घेतले होते. मानखुर्द येथील बालसुधारगृहात त्याला ठेवण्यात आले होते. पण तो तेथूनही पळून गेला. तेव्हा पोलिसांनी पुन्हा एकदा त्याला शोधून काढले आणि मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95692 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..