फिल्म निर्मात्याला धमकी देणारा अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फिल्म निर्मात्याला धमकी देणारा अटकेत
फिल्म निर्मात्याला धमकी देणारा अटकेत

फिल्म निर्मात्याला धमकी देणारा अटकेत

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : बॉलीवूड निर्माता संदीप सिंग यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. जुलै २०२२ मध्ये संदीप सिंग यांच्या फेसबुक टाईमलाईनवर धमक्यांच्या पोस्ट केल्या गेल्या होत्या. त्यानंतर अंबोली पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. संदीप सिंग अंधेरी पश्चिम येथे राहतात. त्यांनी सरबजीत, अलीगढ, झुंड आणि पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटांची निर्मिती केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुझे सिद्धू मूसवाला की तरह मार दूंगा याद रख, असे धमकीच्या पोस्टमध्ये म्हटले होते. आरोपीला बिहारमधून अटक केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95698 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..