मोबाईल चोरासह दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल चोरासह दोघांना अटक
मोबाईल चोरासह दोघांना अटक

मोबाईल चोरासह दोघांना अटक

sakal_logo
By

चेंबूर, ता. ५ (बातमीदार) ः मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणून चोरासह त्याच्याकडील मोबाईल विकत घेणाऱ्या इसमास टिळक नगर पोलिसांनी अटक केली.
जमीर हसन समीर सय्यद असे या आरोपीचे नाव आहे.
टिळक नगर कॉलनीमध्ये राहणाऱ्या नम्रता अतुल झुगे या युनिव्हर्सल स्कूल मार्गावरून मोबाईलवर बोलत असतानाच अचानक दुचाकीवरून आलेला एक इसम त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पसार झाला होता. याबाबत त्यांनी टिळक नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा नोंद करून सीसी टीव्ही फुटेजनुसार तपास करून चोराला तसेच त्याच्याकडील दुचाकी ताब्यात घेतली. त्‍यानंतर चोरीचे मोबाईल त्याच्याकडून विकत घेणारा फारूक यालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडून २६ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. या तपासात पोलिस निरीक्षक विलास राठोड, पोलिस निरीक्षक प्रमोद जगदेव, सपोनि दिनेश आनंदे व अन्य तपास पथक यांनी मोलाची कामगिरी केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील काळे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95719 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..