अवाजवी खर्चाला फाटा देणारा रिटघरचा राजा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवाजवी खर्चाला फाटा देणारा रिटघरचा राजा
अवाजवी खर्चाला फाटा देणारा रिटघरचा राजा

अवाजवी खर्चाला फाटा देणारा रिटघरचा राजा

sakal_logo
By

वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा

नवीन पनवेल, ता. ५ : पनवेल तालुक्यातील रिटघर गावात ‘एक गाव एक गणपती’ची प्रथा १९७५ पासून गेली ४८ वर्षे निरंतर जोपासली जात आहे. गणेशोत्सव गावाच्या एकोप्याचे प्रतीक समजला जातो. पनवेल तालुक्यातील आगरीबहुल लोकवस्ती असलेल्या काळुंद्रे नदीलगतच्या रिटघर गावाने ‘एक गाव एक उत्सवाच्या’ माध्यमातून जनतेसमोर एक आदर्श उभा केला आहे. १९७५ मध्ये पडलेल्या दुष्काळामुळे गावातील काही जाणकार मंडळींनी अवाजवी खर्चाला फाटा देत ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना मांडली. ती आजतागायत सुरू आहे.
गणेशोत्सव म्हटलं की, गावागावांत, गल्लोगल्ली, घराघरांत बाप्पाची प्रतिष्‍ठापना करण्यात येते. मात्र, पनवेल तालुक्‍यातील रिटघर गावाने गेल्या ४८ वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’ची संकल्‍पना अविरत जोपासली आहे. गावातील सर्व समाजाच्या महिला, पुरुष आणि आबालवृद्ध एकत्र येत सार्वजनिक गणेशोत्‍सव, गौरीउत्‍सव, नवरात्रोत्‍सव, जन्माष्‍टमी उत्‍सव साजरा करतात.
गावात ४०० घरे असून लोकसंख्या १८०० च्या आसपास आहे. दरवर्षी गणपती व गौरी उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व खेळांचे आयोजन केले जाते. या गावाला आध्यात्मिक परंपरा आहे. त्‍यामुळे कोणाकडेही घरगुती गणपतीची प्रतिष्‍ठापना केली जात नाही. संपूर्ण गाव एकाच ठिकाणी उत्सव साजरा करतो. गावातील तरुण एकत्र येऊन मंडप सजावट आणि इको-फ्रेंडली आरास तयार करतात. या वर्षी प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने देखावा तयार करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95732 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..