गौरी संगे निघाले गावाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गौरी संगे निघाले गावाला
गौरी संगे निघाले गावाला

गौरी संगे निघाले गावाला

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ५ : मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण-उत्सवांवर लादण्यात आलेले निर्बंध कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येताच राज्य सरकारकडून हटविण्यात आले. त्यामुळे यंदा गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मागील सहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर जिल्ह्यातील ४२ हजार, तर माहेरी आलेल्या १८ हजार गौराई मातेला भावपूर्ण वातवरणात साश्रूनयनांनी सोमवारी निरोप देण्यात आला.

यंदा ठाणे शहरात गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने मासुंदा तलाव, खारेगाव तलाव, न्यू शिवाजी नगर, ऋतू पार्क, खिडकाळी तलाव, दातीवली तलाव, वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव नं.१, रायलादेवी तलाव नं.२, उपवन येथे पालायदेवी मंदिर, आंबेघोसाळे तलाव, निळकंठ वुडस् उपवन तलाव, बाळकूम रेवाळे आणि कावेसर (हिरानंदानी) या ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहे. गणेशमूर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे या दृष्टिकोनातून महापालिकेच्या वतीने पारसिक रेतीबंदर, कोलशेत, कोपरी (चेंदणी कोळीवाडा) कळवा पूल (निसर्ग उद्यान), कळवा (ठाणे बाजू), बाळकूम घाट आणि दिवा घाट असे एकूण सात विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत.
विधिवत विसर्जन
३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला ठाणे शहर पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात एक लाख ४० हजार ३६६ घरगुती बाप्पांचे आगमन झाले आहे. त्यातील दीड दिवसाच्या ४२ हजार बाप्पांना साश्रुनयनांनी निरोप दिला. त्यानंतर सहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर सोमवारी ठाणे जिल्ह्यातील १६९ सार्वजनिक, ४१ हजार ८६८ घरगुती, तर १८ हजार १२६ गौराई मातांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. यामध्ये ठाणे पोलिस आयुक्तालयातील ९२ सार्वजनिक, ३४ हजार ९७४ घरगुती, तर १२ हजार २६० गौराई मातांना, तसेच ग्रामीण भागातील ७७ सार्वजनिक, ६ हजार ८९४ घरगुती तर, ५ हजार ८६५ गौराई मातांचा समावेश आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95734 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..