९५ वर्षांची परंपरा असणारे वैश्य समाज युवक गणेशोत्सव मंडळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

९५ वर्षांची परंपरा असणारे वैश्य समाज युवक गणेशोत्सव मंडळ
९५ वर्षांची परंपरा असणारे वैश्य समाज युवक गणेशोत्सव मंडळ

९५ वर्षांची परंपरा असणारे वैश्य समाज युवक गणेशोत्सव मंडळ

sakal_logo
By

कल्याणमधील दूधनाका परिसरामधील लक्ष्मी नारायण मंदिरात वैश्य समाज युवक मंडळाकडून गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. मंडळाचे यंदाचे ९५ वे वर्ष आहे.

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केल्यानंतर पुणे, कल्याण हे नाते सासर व माहेर असे सुरू झाले. पुणे येथील थोरले बाजीराव पेशवे यांची कल्याण ही सासूरवाडी. कल्याणमधील पारनाका परिसरातील आता असलेली अभिनव विद्या मंदिर येथे असलेल्या बिवलकर वाड्यात त्यांचे लग्न झाले होते. पुण्याला सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केल्यानंतर कल्याणमधील सुभेदार वाड्यात स्वतः लोकमान्य टिळकांनी श्री गणेशा केला. त्यानंतर सर्व जाती व समाजाचे गणेशोत्सव सुरू झाले. त्यामध्ये कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव मेळा संघाची ओळख आहे. मेळा संघाचा गणपती विसर्जन एकादशी म्हणजे आठव्या दिवशी होते. पुण्यातील गणेशभक्तांना कल्याणचे गणपती बघायला मिळावे व कल्याणकरांना पुण्याचे गणपती बघायला मिळावेत, यासाठी मेळा संघाची स्थापना झाली. मेळा संघात पूर्वी ३६ मंडळांची नोंद होती, त्यात सर्व समाज जातीचे गणपती मंडळे आहेत. आता सरकारी नियमानुसार विसर्जन होण्यासाठी होणारा वेळ व काळानुसार मंडळे कमी झाली असून सध्या १३ मंडळे आहेत. वैश्य वाणी समाजाचा मेळा क्र. ५ वा आहे.

कल्याण पश्चिममधील दूधनाका परिसरात पूर्वी वाणी समाजाची वस्ती होती, तेव्हा या रस्त्याला वाणी गल्ली संबोधत असत. आता या परिसरातील श्री लक्ष्मी नारायण मंदिरात सर्व सण साजरे केले जातात. त्यातील एक गणेशोत्सव असून सजावट सामाजिक विषयांच्या अनुषंगाने केली जाते. यावर्षी प्रशांत शेटे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. गोकुळाष्टमी, रामनवमी, एकादशी दिवशी कीर्तन, प्रवचन, काकडा, भंडारा आदी विविध कार्यक्रम राबविले जात असल्याची माहिती ठाणे पालघर जिल्हा महाराष्ट्रीय वैश्य समाज संघाचे अध्यक्ष विजय वसंत निकते यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95735 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..