बनावट डीमांड ड्राफ्टने ५० लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट डीमांड ड्राफ्टने ५० लाखांची फसवणूक
बनावट डीमांड ड्राफ्टने ५० लाखांची फसवणूक

बनावट डीमांड ड्राफ्टने ५० लाखांची फसवणूक

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : बनावट डिमांड ड्राफ्ट देऊन दोघांनी वाशीतील एका बांधकाम व्यावसायिकाकडून ५० लाख रुपये उकळून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या दोघा ठकसेनांनी आयसीआयसीआय बँकेचे असिस्टंट मॅनेजर व ब्रँच मॅनेजर या दोघांचे बनावट शिक्के व बनावट सह्यांचा वापर करून बनावट डिमांड ड्राफ्ट तयार केल्याचे उघडकीस आले आहे.
वाशी पोलिसांनी प्रवीण नार्वेकर व मिलिंद प्रधान या दोघांविरोधात बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव राजेश व्होरा असे असून त्यांचे कंपनीचे कार्यालय वाशी सेक्टर- १७ मध्ये आहे. एप्रिल २०२२ मध्ये एका कंपनीचे डायरेक्टर असल्याचे भासवून प्रवीण व मिलिंद या दोघांनी व्होरा यांची वाशी येथील कार्यालयात भेट घेतली होती. त्या वेळी त्यांनी फायनान्स व हॉटेलचा व्यवसाय करत असल्याचे सांगून ५० लाख रुपयांची मागणी केली. व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातील काही टक्क्यांसह त्यांची रक्कम त्यांना ४५ दिवसांत परत करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच सिक्युरिटी म्हणून डिमांड ड्राफ्ट दिला होता. ४५ दिवसांत दोघांनी पैसे परत न केल्याने ड्राफ्ट खात्यात टाकला असता तो बनावट असल्याचे कळले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95759 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..