डहाणूत ‘घरघर कापडी पिशवी’ उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणूत ‘घरघर कापडी पिशवी’ उपक्रम
डहाणूत ‘घरघर कापडी पिशवी’ उपक्रम

डहाणूत ‘घरघर कापडी पिशवी’ उपक्रम

sakal_logo
By

कासा, ता. ५ (बातमीदार) : पेन्स सहयोग फाऊंडेशन संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित ‘घर घर कापडी पिशवी’ या पर्यावरणपूरक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या संस्थेशी जोडल्या गेलेल्या नागरिकांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात डहाणू तालुक्यातून करण्यात आली. शासनाने प्लास्टिक मुक्तीचा संकल्प सोडला आहे, पण अजूनही प्लास्टिकचा वापर होताना दिसत आहे. त्यामुळे पेन्स सहयोग फाऊंडेशनने संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित कापडी पिशवीचा वापर वाढवण्यासाठी ‘घराघरांत कापडी पिशवी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. डहाणू, वाणगाव, बोईसर तसेच शहरी भागातल्या गर्दीच्या ठिकाणी कापडी पिशव्यांचे बुथ उभारून कापडी पिशव्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. या उपक्रमातून दात्यांच्या मदतीने जागोजागी प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती तसेच कापडी पिशव्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्लास्टिक पिशवी विरोधी या मोहिमेत नागरिकांनी कापडी पिशवी वापरून सहकार्य करावे, असे आवाहन या संस्थेचे अध्यक्ष योगेश सावे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95774 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..