Mumbai Traffic: बंद रस्त्यांची अन् ट्राफिकची माहिती आता मिळणार गुगल मॅपवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Traffic: बंद रस्त्यांची अन् ट्राफिकची माहिती आता मिळणार गुगल मॅपवर
वाहतूक कोंडीची माहिती गुगल मॅपवर

Mumbai Traffic: बंद रस्त्यांची अन् ट्राफिकची माहिती आता मिळणार गुगल मॅपवर

कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधानंतर यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मुंबईतील विविध मंडळांच्या गणरायाच्या दर्शनासोबतच देखावे पाहण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली आहे. या कालावधीत वाहतुकीची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक पोलिस आणि महापालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून गणेश विसर्जनाच्या दिवशी वाहतूक कोंडीबाबत मुंबईकरांना गुगल मॅपवर माहिती मिळणार आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील अनेक रस्ते बंद असणार आहेत, तर काही ठिकाणी वाहतूक व्यवस्थेत बदल केला जाणार आहे.

मुंबई शहरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकूण ७६ ठिकाणी रस्ते बंद असणार आहेत, तर ५४ रस्त्यांवर एकेरी वाहतूक असणार आहे. अवजड वाहनांसाठी ५७ रस्त्यांवर बंदी असणार आहे, तर ११४ ठिकाणी वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, म्हणून वाहतूक कोंडीबाबतची अचूक माहिती गुगल मॅपवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिका, वाहतूक पोलिस आणि गुगल मॅप्सने पुढाकार घेतला आहे. एखादा रस्ता बंद असल्याबाबतची माहिती महापालिकेच्या वतीने व्हॉट्सॲपवरही दिली जाणार आहे. तसेच गुगल मॅपवर लाल रेषेच्या माध्यमातून बंद असलेल्या रस्त्याचीही माहिती दिली जाईल. त्याचवेळी पर्यायी मार्गाचीही सूचना देण्यात येत आहे.

चॅटबोटचीही सुविधा
गुगल मॅपप्रमाणेच मुंबई महापालिकेने वाहतूक व्यवस्थेबाबत चॅटबोटच्या माध्यमातूनही माहिती उपलब्ध करून दिली आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने नागरी प्रश्नांबाबत चॅटबोटची सुविधा मुंबईकरांसाठी पुढे आणली होती. आता गुगल मॅपचे फीचरही चॅटबोटवर उपलब्ध करून दिले आहे. याआधी गुगल मॅपवर कोविड कंटेनमेंट झोनची माहिती दिली होती. यंदा बंद रस्त्यांची माहिती गुगल आणि लेप्टनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95775 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..