दोन कंटेनरमध्ये सापडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन कंटेनरमध्ये सापडून मृत्यू
दोन कंटेनरमध्ये सापडून मृत्यू

दोन कंटेनरमध्ये सापडून मृत्यू

sakal_logo
By

उरण, ता. ५ (वार्ताहर) ः उरण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भेंडखळ कोनेक्स टर्मिनल या कंटेनर यार्डमध्ये दोन कंटेनरच्या मध्ये सापडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ( ता. ५) सकाळी अंदाजे १० वाजण्याच्या सुमारास घडली. प्रवीण सिंग (वय ३७) असे या मृत व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दहा दिवसांपूर्वी वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील कंटेनर यार्डमध्ये एका कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्याच भागात आणखी एकाचा गाडीच्या टायरखाली येऊन मृत्यू झाला होता. या घटनेमुळे सर्व यार्ड परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून हळहळ व्यक्त केली जात आहे. दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95776 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..