कंटेनरने ठोकल्याने दुचाकीस्वार ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंटेनरने ठोकल्याने दुचाकीस्वार ठार
कंटेनरने ठोकल्याने दुचाकीस्वार ठार

कंटेनरने ठोकल्याने दुचाकीस्वार ठार

sakal_logo
By

भिवंडी, ता. ५ (बातमीदार) : ठाण्याहून भिवंडीकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराला मुंबई-नाशिक महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. कुसाईकुमार तिरुपती येलगट्टी (वय २४) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून तो भिवंडीत मामाकडे येण्यासाठी निघाला असता त्याच्या दुचाकीला कंटेनरने मागून धडक लागल्याने तो रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात तिरुमल्लेश अशोक चिटियाल यांनी तक्रार दिल्यावर अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95777 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..