भारताला सिंगापूरकडून मिळाला सर्वाधिक एफडीआय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारताला सिंगापूरकडून मिळाला सर्वाधिक एफडीआय
भारताला सिंगापूरकडून मिळाला सर्वाधिक एफडीआय

भारताला सिंगापूरकडून मिळाला सर्वाधिक एफडीआय

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : भारताला २०२१-२२ या आर्थिक वर्षात ५८.८ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक प्राप्त झाली आहे. यामध्ये सिंगापूरची गुंतवणूक सर्वाधिक होती. १५.९ अब्ज डॉलर गुंतवणुकीसह थेट परकीय गुंतवणूकच्या यादीत सिंगापूर प्रथम क्रमाकांवर आहे. यानंतर १०.५ अब्ज डॉलर्सच्या एफडीआयसह अमेरिका दुसऱ्या, तर ९.४ अब्ज डॉलर्ससह मॉरिशस तिसऱ्या क्रमाकांवर आहे. जर्मनी, कॅनडा, फ्रान्स आणि डेन्मार्क यांसारख्या देशांनी या चालू आर्थिक वर्षात भारतामध्ये १ अब्ज डॉलरहून कमी गुंतवणूक केली आहे. याउलट केमन आयलंड या देशाने भारतात ३.८ अब्ज डॉलरची गुंतवणूक करत भारतात थेट परकीय गुंतवणूक करणाऱ्या पहिल्या १५ देशांच्या यादीत नाव पटाकावले आहे. गेल्या पाच वर्षांत सिंगापूरनंतर एफडीआयमध्ये अमेरिका आणि मॉरिशसचे नाव आघाडीवर राहिले आहे.

यादीतून चीनचं नाव गायब
-----------------------------
एफडीआयच्या यादीतून चीनचे नाव गायब आहे. तज्ज्ञांच्या मते, भारत सरकार चिनी कंपन्यांना कमी प्रमाणात मान्यता देते, या वर्षी जुलैमध्ये चिनी कंपन्यांकडून ३८२ एफडीआय प्रस्ताव आले होते, त्यापैकी फक्त ८० कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यास परवानगी देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95781 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..