गणेशोत्सवाच्या निमित्ताने कर्करुग्णांची व्यथा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवाच्या निमित्ताने कर्करुग्णांची व्यथा
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कर्करुग्णांची व्यथा

गणेशोत्सवाच्या निमित्ताने कर्करुग्णांची व्यथा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : गणेशोत्सव साजरा करताना अनेक मंडळांनी जनजागृतीपर देखावे उभे केले आहेत. त्यातून, लोकांमध्ये जास्तीत जास्त जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईच्या फ्रँकलिन पॉल यांनीदेखील यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘कर्करुग्णांची कहाणी’ या संकल्पनेवर आधारित देखावा साकारला आहे. रतन टाटा यांना अभिवादन करण्यासाठी त्यांनी ‘पॉलचा लाडका’च्या माध्यमातून ‘टाटा कॅन्सर रुग्णालय आणि आजूबाजूचा परिसर’ याची प्रतिकृती तयार केली आहे. २० जणांच्या विशेष मेहनतीने हा देखावा उभारण्यात आला आहे.
मुंबईतील सायन प्रतिक्षानगर येथे राहणारे फ्रँकलिन पॉल हे गेले २९ वर्षे घरगुती बाप्पांची आरास करत आहेत. दीड फुटाची शाडू मातीची मूर्ती साकारत त्यांच्या घरी पारंपारिक पद्धतीने बाप्पा विराजमान झाले आहेत. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवात त्यांनी कर्करुग्णांची व्यथा मांडली आहे.
फ्रँकलिन पॉल हे अनेकदा कोणत्याही कामासाठी जाताना एफ दक्षिण या विभागात फेरफटका मारतात. ज्या ज्या वेळेस ते या रस्त्यावरून गेले, त्या वेळेस त्यांना कर्करुग्ण रस्त्यावर दिसले. नाकात नळी, सुरकुतलेले चेहरे, गेलेले केस अशा छोट्या - छोट्या गोष्टी त्यांनी या देखाव्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘पॉलचा लाडका’ असे यंदाच्या संकल्पनेला नाव देण्यात आले आहे.
कर्करुग्णांचे आयुष्य सर्वसामान्यांपेक्षा वेगळे आणि कठीण असते. कर्करोगामुळे सर्वसामान्य ग्रासू लागले आहेत. त्यांची या रोगासोबतची लढाई कायमस्वरूपी सुरू राहते. पण, त्यांच्या या लढाईत टाटा कर्करोग स्मारकातील रुग्णसेवक व काही संस्था त्यांना साथ करतात. टाटा समूहाच्या प्रेरणेतून टाटा कर्करोग रुग्णालय उभारले गेले. गेली अनेक वर्षे टाटा रुग्णालय देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या रुग्णांना सेवा देत आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक करण्यासाठी हा गणेशोत्सव कर्करुग्ण, रुग्णसेवक आणि टाटा समूहाचे सामाजिक विचार समाजाच्या विविध पातळीवर रुजवण्याचे काम या देखाव्यामार्फत केले गेले आहे. या देखाव्यातून रतन टाटा यांचेही कौतुक आणि आभार व्यक्त केले गेले आहेत. कर्करुग्णांना पैशांपेक्षा सहानुभुतीची जास्त गरज आहे. त्यामुळे, आपले एक छोटे कृत्य त्यांच्यासाठी तो खूप मोठा मानसिक आधार असू शकेल. त्यामुळे, गणेशोत्सवाच्या केंद्रस्थानी कर्करुग्णांची कहाणी ठेऊन हा देखावा साकारण्यात आला आहे.
१५ ते २० दिवसांच्या या मेहनतीत २०० जणांनी हातभार लावला आहे. या देखाव्याचे लिखाण प्रियेश त्रिपाठी, कला दिग्दर्शन सुनित आजरेकर आणि संकल्पना फ्रँकलिन पॉल यांनी लिहिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95794 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..