शिक्षक दिनी विद्यार्थांना शिक्षकांकडून भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक दिनी विद्यार्थांना शिक्षकांकडून भेट
शिक्षक दिनी विद्यार्थांना शिक्षकांकडून भेट

शिक्षक दिनी विद्यार्थांना शिक्षकांकडून भेट

sakal_logo
By

घाटकोपर, (बातमीदार) ः घाटकोपर पारशीवाडी येथील अभ्युदय ज्ञानवर्धीनी संस्था संचालित अभ्युदय विद्यालयात श्री गणरायाच्या साक्षीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थांना वह्या आणि पेन भेट देत ज्ञान मिळवा आणि भरपूर प्रगती करा, अशा शुभेच्छा दिल्या. आज शिक्षक दिन व त्यात गणपतीचे विसर्जन या पार्श्वभूमीवर शाळेचे अध्यक्ष आर. जी. हुले व संचालिका अलका हुले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक तुषार हुले, राहुल हुले यांच्या वतीने शाळेतील शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थांना वह्या आणि पेन भेट देण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक लक्ष्मण देशमुख, सहशिक्षक प्रल्हाद पवार, सीताराम आरोटे, संजय सरगर, दशरथ कोळी, रवींद्र घोडेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95801 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..