वाहनचालक २.८० कोटी घेऊन पसार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहनचालक २.८० कोटी घेऊन पसार
वाहनचालक २.८० कोटी घेऊन पसार

वाहनचालक २.८० कोटी घेऊन पसार

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : एटीएम मशीनमध्ये पैसे भरणाऱ्या कंपनीचा वाहनचालक २.८० कोटी रुपये घेऊन फरारी झाल्याची घटना सोमवारी (ता. ५) गोरेगाव येथे घडली. पश्चिमेकडील युनियन बँकेत कॅश भरणारे वाहन पैसे भरण्यासाठी पोहोचले असताना ही घटना घडली. उदयभान सिंग असे चालकाचे नाव आहे. सिंग दोन महिन्यांपूर्वी चालक म्हणून रुजू झाला होता. एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी गेलेले परतल्यानंतर त्यांना सिंग आणि वाहनही सापडले नाही. त्यांनी जीपीएसद्वारे कारचे ठिकाण शोधले. ती गोरेगाव पश्चिमेतील पिरामल नगर परिसरात एका निर्जन ठिकाणी आढळली. मात्र, तिच्यातील २.८० कोटी रुपयांची रक्कम सिंग याने पळवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95813 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..