कमाल खानवर विनयभंगाचा गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कमाल खानवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
कमाल खानवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

कमाल खानवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : समाज माध्यमावर अभिनेत्यांविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी केल्याप्रकरणी आधीच अटक असलेला अभिनेता कमाल रशीद खान ऊर्फ ​​केआरकेविरोधात वर्सोवा पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी रविवारी (ता. ४) अटक केली. जून २०२१ मध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खान याने जानेवारी २०१९ च्या पहिल्या आठवड्यात तक्रारदाराकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. कमाल खानला गेल्या आठवड्यात मालाड पोलिसांनी वादग्रस्त ट्विटप्रकरणी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली होती. अटकेपूर्वी कमाल खानला बोरिवली न्यायालयात हजर करण्यात आले होते. दिवंगत अभिनेते इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्याबद्दल ट्विट करून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कमाल याच्यावर होता.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95819 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..