नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळला
नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळला

नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळला

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ ः एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज विशेष एन. आय. ए. न्यायालयाने सोमवारी (ता. ५) फेटाळला. नवलखा यांना ऑगस्ट २०१८ मध्ये अटक झाली होती. त्यांनी सहा महिन्यांपूर्वी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी आरोग्यविषयक कारणे दिली होती. त्यांना आधी नजरकैदेत ठेवण्यात आले होते. नंतर प्रथम न्यायालयीन कोठडीत ठेवून मग तळोजा कारागृहात हलवण्यात आले होते. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने या जामीन अर्जाला विरोध केला होता. ते माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असल्याचे त्यांचे म्हणणे होते. विशेष न्यायालयाचे न्या. राजेश कटारिया यांनी दोन्ही बाजू ऐकल्यावर नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95835 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..