शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती!
शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती!

शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती!

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : भारतात ‘नवीन शैक्षणिक धोरण २०२०’ चा अवलंब करण्यात आला आहे. या धोरणामुळे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती होईल, असा विश्वास केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. शहा यांच्या उपस्थितीत पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन आज करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, खासदार मनोज कोटक, एल अँड टी चे अध्यक्ष ए. एम. नाईक, सीईओ एस. एम. सुब्रमण्यम, चॅरिटेबल ट्रस्टचे जिग्नेश नाईक, प्राचार्य मधुरा फडके उपस्थित होते.

नवीन शैक्षणिक धोरण बहुआयामी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा लाभ होणार आहे. शिक्षकांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे मानवतावादी, आध्यात्मवादी विचार देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा मनात रुजवावेत. एक उत्तम शिक्षक कसा असावा, यांचा बोध घ्यायला हवा. शिक्षकांनी बालकांना समाजातील उत्तम नागरिक बनवावे. पंचतंत्रसारख्या बोधकथांच्या माध्यमातून विद्यार्थी घडवावेत, असे आवाहन अमित शहा यांनी केले. तर नवीन शैक्षणिक धोरणामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबर त्यांचे चांगले चारित्र्य निर्माण होणार आहे. या धोरणामुळे समाजातील सर्व वर्गातील व्यक्तींना समान संधी उपलब्ध होतील. विद्यार्थी हे हिऱ्यासारखे मौल्यवान असून त्यांना पैलू पाडण्याचे कार्य शिक्षक करतात, असे सांगून शिक्षक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95836 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..