प्रभादेवीत घडणार प्रशासकीय अधिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभादेवीत घडणार प्रशासकीय अधिकारी
प्रभादेवीत घडणार प्रशासकीय अधिकारी

प्रभादेवीत घडणार प्रशासकीय अधिकारी

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. ६ (बातमीदार) : येत्या पाच वर्षांच्या कालावधीत प्रभादेवी परिसरातील १० विद्यार्थ्यांच्या प्रशासकीय अधिकारी परीक्षेचा सर्व खर्च उचलण्याचा संकल्प मध्य प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केला आहे. तसेच या भागात २५ उद्योजक निर्माण करण्यासाठी हे मंडळ सज्‍ज झाले आहे.
प्रभादेवी येथील मध्य प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा पर्यावरणपूरक गणपती व सजावट साकारली असून या गणेशोत्सवात प्रशासकीय अधिकारी व उद्योजक घडविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे प्रभादेवी परिसरातून कौतुक करण्यात येत आहे. प्रभादेवी परिसरातून प्रशासकीय अधिकारी घडावेत, या दृष्टिकोनातून पाच वर्षांत दहा विद्यार्थ्यांचा प्रशासकीय अधिकारी प्रशिक्षण वर्गाचा व परीक्षेचा खर्च मंडळाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे मंडळाचे धनंजय खाटपे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे छोट्या लघु उद्योजकांना बाजारपेठ मिळावी, योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी तज्‍ज्ञांमार्फत वेळोवेळी सेमिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच २५ होतकरू तरुणांना भांडवलदेखील देण्यात येणार आहे.
मध्य प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने समाज प्रबोधनातमक कार्यक्रम व समाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. या वेळी प्रशासकीय अधिकारी व उद्योजक निर्माण करण्याच्या संकल्‍पा बरोबरच परिसरातील मुलांना प्राण्यांशी मैत्री घडावी यासाठी प्राण्यांशी मैत्री तसेच इतिहासकालीन खेळ याचे प्रदर्शन भरविण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष सुभाष सारंग यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95840 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..