शौचालायामुळे पादचारी पुलाला धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शौचालायामुळे पादचारी पुलाला धोका
शौचालायामुळे पादचारी पुलाला धोका

शौचालायामुळे पादचारी पुलाला धोका

sakal_logo
By

धारावी, ता. ६ (बातमीदार) : मध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानकातून पूर्वेला बाहेर पडण्यासाठी असलेल्या पादचारी पुलाखाली पालिकेचे ‘पैसे द्या आणि वापरा’ तत्त्‍वावर शौचालय चालवले जात आहे. पालिकेच्या शौचालयात निर्माण होत असलेला वायू बाहेर पडण्यास योग्य ती सुविधा नसल्याने पादचारी पुलाला आतून गंज लागला आहे. यामुळे पादचारी पूल धोकादायक झाला आहे. या पुलावरून मध्य व पश्चिम रेल्वेचे हजारो प्रवासी दररोज ये-जा करत असतात. गर्दीच्या वेळेस पूल हलत असतो. यामुळे प्रवासी जीव धोक्यात घालून पुलाचा वापर करत आहेत.
पालिकेचे हे शौचालय जनसेवा मजूर सहकारी संस्था, मुंबई यांच्यातर्फे चालवले जात आहे. बाहेरून सुंदर दिसत असलेले शौचालय आतून खराब होत चालले आहे. पुलाच्या जिन्याखाली पुरुषांची मुतारी आहे. या मुतारीला आतून प्लास्टिकचे आच्छादन घालण्यात आले आहे. पुलावरून वाहणारे पाणी गळत असल्याने हे आच्छादन घातले आहे. मुतारीत उभे राहता येत नाही. अशी वाईट अवस्था शौचालयाची झाली आहे. जर अचानक एखादी दुर्घटना घडल्यास पुलावरील प्रवासी व शौचालयातील लोकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाने यावर त्‍वरित उपाय करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95844 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..