सरळगावात वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरळगावात वाहतूक कोंडी
सरळगावात वाहतूक कोंडी

सरळगावात वाहतूक कोंडी

sakal_logo
By

सरळगांव, ता. ६ (बातमीदार) : मुरबाड- कल्याण- माळशेज घाट या महामार्गावरील सरळगांव येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक व ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. तालुक्यातील सरळगांव हे आठवडी बाजारासाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे. या ठिकाणी रस्त्यालगत दर मंगळवारी बैल बाजारासोबत, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा बाजार भरतो. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यातच रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर वाहने अनधिकृत पार्किंग केल्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यात स्थानिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप, रिक्षाचालक रस्त्यालगत वाहने लावत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

राष्ट्रीय महामार्गापासून दोन फुटाची जागा सोडून बाजार भरत असल्याने, या रस्त्याच्या लगत वाहने उभी केली जातात. यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. येथे हाकेच्या अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर पोलीस चौकी असूनही या वाहतूक कोंडीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहे. रस्त्यालगत होणाऱ्या अनधिकृत पार्किंगमुळे येथे मोठी दुर्घटना झाल्यास याला जबाबदार कोण, प्रशासन अपघात होण्याची वाट पाहत आहे का, असा प्रश्‍, स्थानिक ग्रामस्थ विचारत आहेत.


पोलिस विभागाला वारंवार सांगूनही दखल घेतली जात नाही. पोलिस खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता रोज चार पोलिस कर्मचारी ठेवावेत, अशा सूचनाही करण्यात आल्या होत्या. मात्र स्थानिक पोलिस अधिकारी पोलिसांची संख्या कमी असल्याची सबब पुढे करत असल्याने वाहतूक कोंडी ही डोकेदुखी झाली आहे.
- मधुकर घुडे, सरपंच, सरळगाव ग्रामपंचायत

पोलुस विभागाने नियोजन केल्यास व वेडीवाकडी वाहने उभी करणाऱ्यांना शिस्त लावल्यास वाहतूक कोंडी दूर होऊ शकते.
- चेतन घुडे, माजी सरपंच, सरळगाव ग्रामपंचायत

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95845 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..