निर्माल संकलन केल्याने नदी पात्र व परिसर स्वच्छ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्माल संकलन केल्याने नदी पात्र व परिसर स्वच्छ
निर्माल संकलन केल्याने नदी पात्र व परिसर स्वच्छ

निर्माल संकलन केल्याने नदी पात्र व परिसर स्वच्छ

sakal_logo
By

सरळगाव, ता. ६ (बातमीदार) : निर्माल्य संकलन योजना राबवल्याने मुरबाड तालुक्यातील शिवळे येथील नदीवर गणपती विसर्जन होऊनही नदीपात्रात एकही निर्माल्य न टाकल्याने नदीपात्र स्वच्छ राहिल्याचे चित्र पहिल्यांदाच पाहावयास मिळाले.

दर वर्षी गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी नदीपात्र व परिसरात अस्ताव्यस्त पडलेले निर्माल्य दिसते. या निर्माल्याने नदीपात्र दूषित होऊन परिसरात दुर्गंधी पसरते. या वर्षी याची दखल डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने घेत, प्रतिष्ठानच्या माध्यमातून निर्माल्य संकलन राबवण्याच्या सूचना संपूर्ण महाराष्ट्रात देण्यात आल्या होत्या. या सूचनेवरून निर्माल्य नदीपात्रात व परिसरात न टाकता संकलन करून शेतामध्ये खड्डे करून त्या खड्ड्यात टाकण्यात आले. यामुळे या वर्षी गणपती विसर्जनानंतरही नदीपात्र व परिसर स्वच्छ झाल्याचे पाहावयास मिळाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95846 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..