पालघर जिल्ह्यात ई. केवायसी भरण्यात अडचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर जिल्ह्यात ई. केवायसी भरण्यात अडचणी
पालघर जिल्ह्यात ई. केवायसी भरण्यात अडचणी

पालघर जिल्ह्यात ई. केवायसी भरण्यात अडचणी

sakal_logo
By

पालघर, ता. ५ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील ६४ हजार १०८ शेतकरी लाभार्थ्यांची ई. केवायसी प्रक्रिया करणे बाकी असल्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या बाराव्या हप्त्यापासून लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबरपर्यंत ई. केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळविण्यासाठी केंद्र शासन स्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत ई. केवायसी प्रक्रिया करून घेण्याविषयी शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र अद्याप मोठ्या प्रमाणात ई. केवायसी झालेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना ७ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मुदतीमध्ये न भरल्यास पुढील हप्ते बंद केले जातील, असाही इशारा देण्यात आलेला आहे.

कृषी अधिकारी, सर्व तहसीलदार, तलाठी, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना या लाभार्थ्यांचे ई केवायसी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना केवायसीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तांत्रिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांचे केवायसी अपूर्ण राहिलेले आहेत, काही शेतकऱ्यांकडे मोबाईल नाहीत. काही शेतकऱ्यांचे आधार कार्ड आहे; पण बोटाचे ठसे येत नाहीत, फोटो नाहीत, अशा अनेक अडचणी येत आहेत. अशा शेतकऱ्यांचे केवायसी भरणे बाकी आहे, असे एका कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आले.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार योजनेतील लाभार्थ्यांचा डेटा अंतिम व सुनिश्चित करण्याची कार्यवाही विविध काल मर्यादित पूर्ण करायचे आहे. सर्व पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी, तसेच शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन आपल्या गावातील किंवा जवळील सीएससी सेंटर, आपले सेवा केंद्र, किंवा स्वतःच्या मोबाईलवर ई. केवायसी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


कोट
---------------
शासनाच्या निर्देशानुसार गावागावात फिरून लाभार्थी शेतकऱ्यांकडे जाऊन ई केवायसी करून घेण्याची कामे सुरू आहे. काही गावात नेटवर्क मिळत नसल्याने दिवसांकाठी सात-आठ लाभार्थ्यांचे केवायसी भरून पूर्ण होतात. काही लाभार्थीचे आजारीपणा किंवा वयोवृद्धाच्या वयामुळे केवायसी भरणे कठीण जात आहे. ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांनी या कामावर बहिष्कार टाकलेला शासनस्तरावर काम युद्धपातळीवर सुरू आहे
- जगदीश पाटील, कृषी पर्यवेक्षक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95849 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..