तीन दिवसीय दंतवैद्यकीय तपासणी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन दिवसीय दंतवैद्यकीय तपासणी शिबिर
तीन दिवसीय दंतवैद्यकीय तपासणी शिबिर

तीन दिवसीय दंतवैद्यकीय तपासणी शिबिर

sakal_logo
By

शिवडी, ता. ६ (बातमीदार) ः चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ आणि इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ५ सप्टेंबरपासून तीनदिवसीय मोफत दंतवैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’च्या मंडपात करण्यात आले आहे. डॉ. अशोक ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बालाजी ढोबळे, डॉ. चार्मिन परेरा, डॉ. निखिल खंडागळे, डॉ. पल्लवी सेलारे, डॉ. पावन कपाडिया, डॉ. कौशिक श्रीनिवासन, डॉ. खादिजा कुद्रती ही विख्यात दंतवैद्यकीय टीम कार्यरत आहे. तसेच मंडळाच्या कार्यक्षेत्रात सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलिस कर्मचारी यांच्यासाठी तीन दिवस ही मोफत सोय उपलब्ध करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष विद्याधर घाडी दिली आहे. तसेच सोमवारी ६० नागरिकांनी याचा लाभ घेतला असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे मानद सचिव प्रणिल पांचाळ यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95852 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..