जव्हारमध्ये श्रीफळाला वाढती मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जव्हारमध्ये श्रीफळाला वाढती मागणी
जव्हारमध्ये श्रीफळाला वाढती मागणी

जव्हारमध्ये श्रीफळाला वाढती मागणी

sakal_logo
By

जव्हार, ता. ६ (बातमीदार) : गेली दोन वर्षे गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने उत्सवाशी संबंधित सर्वच व्यवसायांच्या उलाढालीवर मोठा परिणाम झाला होता; पण यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यामुळे जव्हारमध्ये यंदा गणेशोत्सवात पूजा, तोरणांसाठी नारळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. तालुक्यात गणेशोत्सव कालावधीत दररोज सुमारे १२,५०० नारळांची विक्री होत आहे. गणेशोत्सवात नारळ विक्रीत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एका नारळाची किंमत ३० ते ४० रुपये झाली आहे.
तालुक्यात गेली दोन वर्षे गणेशोत्सवावर कोरोना संसर्गामुळे निर्बंध होते. त्यामुळे उत्सव काळात नारळ विक्रीवर मोठा परिणाम झाला होता. यंदा मात्र शहरातील हॉटेल व्यावसायिकांकडूनही नारळाला मोठी मागणी आहे. गणेशोत्सवात भक्तिभावाने भाविक ‘श्रीं’ना तोरण अर्पण करतात. यासाठी वापरण्यात येणाऱ्या नारळाची मागणी वाढली आहे. तसेच यंदा उत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने हॉटेल व्यावसायिक, कॅटरिंग व्यावसायिक तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून नारळांच्या मागणीत वाढ झाली आहे. जव्हार शहरात तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील बाजारात दररोज नारळांची आवक होत आहे; तर दररोज १२,५०० नारळ बाजारात विक्रीसाठी पाठविले जातात. तोरणासाठी नवा नारळ वापरला जातो. त्यामुळे या नारळांना कमालीची मागणी असून दर चढेच राहिले आहेत.

यंदा उत्सवावर निर्बंध नसल्याने नारळ विक्रीत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्सव सुरू होण्यापूर्वी तीन ते चार दिवस आधी पालघर व नाशिक जिल्ह्यातील बाजारात तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून नारळांची आवक सुरू झाली होती. भाविकांचा नारळ खरेदीवर विशेष जोर असून लाडक्या बापाला नारळाचे तोरण बांधण्यावर अधिक भर आहे.
- दादा मामा, नारळ व्यावसायिक, जव्हार

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95854 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..