खारघरमध्ये चोरांना बाप्पा पावला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघरमध्ये चोरांना बाप्पा पावला
खारघरमध्ये चोरांना बाप्पा पावला

खारघरमध्ये चोरांना बाप्पा पावला

sakal_logo
By

खारघर, ता. ६ (बातमीदार) : खारघरमध्ये इमारतीत प्रवेश करून महागडे बूट चोरणाऱ्या चोरांना पकडून सोसायटीच्या सदस्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र पोलिसांनी चोरट्यास केवळ समज देऊन सोडल्‍याने चोरांना बाप्पा पावल्‍याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
खारघर सेक्टर ३४ मधील साई मिरॅकल सोसायटी शिरलेल्या चोरांना सोसायटीच्या सदस्यांनी पकडून खारघर पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र पोलिसांनी त्‍यांना समज देऊन सोडले. चोरट्यांनी काही दिवसांपूर्वी ब्लू क्रेस्ट, फॉर्च्युन स्प्रिंग सोसायटीत प्रवेश करून महागडे बूट चोरल्‍याची घटना घडली आहे. दरम्यान सोसायटीत प्रवेश करताना सुरक्षा रक्षकाकडे नोंदणी केलेल्या मोबाईलमध्ये चोरांच्या छायाचित्राची नोंद झाली होती. काही दिवसांनी पुन्हा या चोरांनी सोसायटीत प्रवेश केला असता सुरक्षारक्षकांनी त्‍यांना ओळखले. मात्र पकडण्यापूर्वीच ते पळाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95868 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..