भारतीय प्रतिनिधीत्त्‍वासाठी शारीकला अमेरिकेचे आमंत्रण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय प्रतिनिधीत्त्‍वासाठी शारीकला अमेरिकेचे आमंत्रण
भारतीय प्रतिनिधीत्त्‍वासाठी शारीकला अमेरिकेचे आमंत्रण

भारतीय प्रतिनिधीत्त्‍वासाठी शारीकला अमेरिकेचे आमंत्रण

sakal_logo
By

मालाड, ता. ६ (बातमीदार) ः अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स ऑफ स्टेट डिपार्टमेंटने (अमेरिका) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामधील पाच राज्यांमध्ये लीडरशिप एक्स्चेंज प्रोग्राम आयोजित केला होता. यामध्ये भारतीय प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्यासाठी अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासांनी मालाडचा तरुण शारिक रझा शेख याला अमेरिकेत आमंत्रित केले होते.
२१ दिवसांच्या कार्यक्रमात शारीक रझा यांना सरकारी आणि खासगी क्षेत्राविषयाची माहिती दिली. तसेच नागरिक, शैक्षणिक संस्था, व्यवहारात पारदर्शकता कशी वाढवू शकतात; भ्रष्टाचाराचे निराकरण करण्यासाठी आणि सरकारी पारदर्शकता आणि जबाबदारी सुलभ करण्यासाठी यंत्रणा आणि मार्ग यांना ठळक समोर कसे आणता येईल, यासंदर्भात माहिती दिली गेली. सोबतच क्वाड (quad) देशांबद्दलही सांगण्यास आले. या प्रकल्पांतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि युनायटेड स्टेट्समध्ये सरकारी आणि खासगी क्षेत्राच्या उत्तरदायित्वासाठी नैतिक प्रणालींच्या मूलभूत तत्त्वांची समज वाढवणे, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी नागरिक, पारंपारिक आणि नवीन माध्यमे, शैक्षणिक संस्था आणि नागरी समाज यांची भूमिका सर्वांसमोर आणणे, सरकारी पारदर्शकता अधिक सुलभ करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय देखील समाविष्ट आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95886 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..