डॉ. अनायता पंडोल यांच्यावर शस्त्रक्रिया होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. अनायता पंडोल 
यांच्यावर शस्त्रक्रिया होणार
डॉ. अनायता पंडोल यांच्यावर शस्त्रक्रिया होणार

डॉ. अनायता पंडोल यांच्यावर शस्त्रक्रिया होणार

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ : उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्यासोबत प्रवास करताना झालेल्या अपघातात प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनायता पंडोल (वय ५५) आणि त्यांचे पती दरायस पंडोल (वय ६०) हे गंभीर जखमी झाले आहेत. वापीहून सोमवारी (ता. ५) सकाळी मुंबईच्या एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांनाही अनेक फ्रॅक्चर असून डॉक्टरांचे पथक त्यांच्यावरील शस्त्रक्रियेची योजना आखत आहेत; मात्र डॉ. अनायता यांचा रक्तदाब सध्या सामान्य नसून तो स्थिर करण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत आहेत.
एच. एन. रिलायन्स रुग्णालयाचे सीईओ डॉ. तरंग ग्यानचंदानी म्हणाले, रुग्णालयातील १० डॉक्टरांचे पथक रविवारी रात्रीच दोन्ही रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापी येथे पोहोचले. दोन्ही रुग्णांना एअरलिफ्ट करण्याची तयारी केली; मात्र त्यांना रुग्णवाहिकेने रस्तेमार्गे सोमवारी सकाळी मुंबईत आणण्यात आले. सध्या वीस बहुविद्याशाखीय डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत. दोन्ही रुग्ण आयसीयूत असून ते शुद्धीत आहेत.
---
दोघांनाही अनेक फ्रॅक्चर असून त्यावर शस्त्रक्रिया आवश्यक आहे. शस्त्रक्रियेपूर्वी डॉक्टर आरोग्यविषयक बाबी सामान्य करण्याच्या प्रयत्नात आहेत. सध्या रक्तदाबात चढ-उतार होत असल्याने तो स्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- डॉ. तरंग ग्यानचंदानी, सीईओ, एच. एन. रिलायन्स रुग्णालय

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95893 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..