पोलिस चौकीवरील कारवाईने वातावरण तापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस चौकीवरील कारवाईने वातावरण तापले
पोलिस चौकीवरील कारवाईने वातावरण तापले

पोलिस चौकीवरील कारवाईने वातावरण तापले

sakal_logo
By

कास, ता. ६ (बातमीदार) : डहाणू पारनाका समुद्र किनाऱ्याजवळील ब्रिटीशकालीन जुनी पोलीस चौकी तोडल्याने या विरोधात वातावरण चांगलेच तापले आहे. बेकायदेशीरपणे सरकारी जागेवरील पोलीस चौकी तोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
डहाणू समुद्रकिनाऱ्याजवळील पारनाका येथील ब्रिटीश काळापासून अस्तित्वात असलेली पोलिस चौकी काही दिवसांपूर्वी जेसीबीच्या मदतीने जमीनदोस्त करण्यात आली होती. यासाठी समुद्र किनाऱ्याकडे जाणारा अरुंद रस्ता प्रशस्त करण्यासाठी ही चौकी तोडण्यात आल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी बांधलेली पोलिस चौकी बेकायदेशीरपणे तोडण्यात आल्याने याचे तीव्र पडसाद डहाणूमध्ये उमटले असून सोसायटी फॉर फास्ट जस्टीस या संस्थेने या कारवाईविरोधात तक्रार दाखल केली आहे.
महाराष्ट्र-गुजरात सीमा भाग आणि अरबी समुद्र यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पारनाका पोलिस चौकी महत्त्वाची समजली जाते. तसेच डहाणूचा समुद्र किनारा लागून असल्यामुळे पर्यटकांची सतत वर्दळ सुरू असते. असे असताना अचानक डहाणू नगरपरिषदेने जेसीबीच्या मदतीने तोडक कारवाई करून ही पोलिस चौकी जमीनदोस्त केली होती. ही चौकी कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव व आराखडा तयार न करताच तोडण्याचा आदेश देण्यात आल्याचे समोर आले आहे.
डहाणू समुद्रकिनाऱ्यावरील एका खाजगी हॉटेलला रस्ता तयार करून देण्याच्या नावाने ही पोलिस चौकी बेकायदेशीरपणे तोडल्याचे आरोप होत असून याप्रकरणी जबाबदार सरकारी अधिकारऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी डहाणूचे आमदार निकोले यांनी केली आहे.
......
आंदोलनाचा इशारा
पारनाका येथील पोलिस चौकी ही सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची होती. शिवाय ती ब्रिटिशकालीन असून त्याची सरकारी दरबारी नोंद असताना ही चौकी बेकायदेशीररित्या तोडणाऱ्या आधिकऱ्यावर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा आमदार विनोद निकोले यांनी दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95897 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..