‘मिरारोडचा महाराजा’कडून रोबोटिक्सचे धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मिरारोडचा महाराजा’कडून रोबोटिक्सचे धडे
‘मिरारोडचा महाराजा’कडून रोबोटिक्सचे धडे

‘मिरारोडचा महाराजा’कडून रोबोटिक्सचे धडे

sakal_logo
By

भाईंदर, ता.६ (बातमीदार) : गणपती ही बुद्धीची देवता आहे. त्याची मनोभावे पूजा केली तर संकट दूर तर होतेच शिवाय बुद्धीची प्राप्तीही होते असे मानले जाते. परंतु बाप्पाची केवळ पूजा करुनच नाही प्रत्यक्ष कृती करुन बुद्धीची प्राप्ती करता येईल, हा संदेश दिला आहे मिरारोड येथील शांतीनगर सेक्टर नऊच्या मिरारोडचा महाराजा सर्वजनिक गणेश मंडळाने. गणेशोत्सवाच्या निमित्ताने रोबोटिक्स या आजच्या पिढीच्या विषयावरील मार्गदर्शन व कार्यशाळा तसेच करियर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन मंडळाच्यावतीने करण्यात आले होते.
यंत्रमानव अर्थात रोबोची आवश्यकता प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाची ठरत आहे. मुलांमध्येही त्याचे आकर्षण मोठे आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचे औचित्य साधत मुलांची बौद्धिक भूक भागवण्यासाठी मिरा रोडचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी मुलांना रोबोटिक तंत्रद्न्यानाचे प्राथमिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातली दोन तासांची कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेत वीस वर्षे शिक्षकी पेशात कार्यरत असलेल्या प्रा. सीमा खेतान मुलांना मार्गदर्शन केले. रोबो तयार कसे करायचे, ते कार्य कसे करतात, रोबोना हाताळायचे कसे याच्या प्रात्यक्षिकांसह त्याची सर्कीट व सेन्सर याची तपशिलवार माहिती मुलांना देण्यात आली. १२० हून अधिक मुले या कार्यशाळेत सहभागी झाली होती. अशा प्रकारची रोबोटिक कार्यशाळा व करियर मार्गदर्शन करणारे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे मिरा भाईंदरमधील पहिलेच मंडळ आहे. मंडळाकडून गेली बत्तीस वर्षे गणेशोत्सवाचे आयोजन केले जात असून विविध सामाजिक कार्यात हे मंडळ अग्रेसर राहिले आहे. कोकणात आलेल्या पुरातदेखील मंडळाकडून अन्नधान्य पाठवण्यात आले होते.
....
करियर मार्गदर्शन सत्र
याव्यतिरिक्त मुलांसाठी करियर मार्गदर्शन सत्राचे आयोजन देखील करण्यात आले होते. आज शिक्षणाची अनेक क्षेत्र आहेत त्याचबरोबर करियर करण्यासाठी देखील अनेक मार्ग खुले झाले आहेत. आयए एस, आयपीएस, वैद्य्कीय, वकीली, अभियांत्रिकी, सीए, सीएस या नेहमीच्या मार्गांसह विविध क्षेत्रांसाठी स्वत:ला कसे तयार करायचे याबाबतची माहिती करियर मार्गदर्शन सत्रात मुलांना देण्यात आली. विशेष म्हणजे या दोन्ही सत्रांसाठी मुलांची नोंदणी मंडळाच्या संकेतस्थळाद्वारे करण्यात आली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95902 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..