लम्पीच्‍या लढ्यात १० हजार लसींचे बळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लम्पीच्‍या लढ्यात १० हजार लसींचे बळ
लम्पीच्‍या लढ्यात १० हजार लसींचे बळ

लम्पीच्‍या लढ्यात १० हजार लसींचे बळ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनावरांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषदेकडून या आजाराचा शिरकाव जिल्ह्यात होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद सेस फंडातून १० हजार लसी घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी निविदादेखील मागविण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात सध्या एक लाख ७२ हजारच्या आसपास गाय व म्हैस यांची संख्या आहे. यामध्ये ८० हजार गाई; तर ९२ हजार म्हैशी यांचा समावेश आहे. या जनावरांचे लसीकरण करण्यासाठी सरकारकडून १० हजार लशींचा साठा प्राप्त होणार आहे; पण जनावरांची संख्या आणि आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता, आता ठाणे जिल्हा परिषदेने जनावरांचे लवकरात लवकर लसीकरण व्हावे, यासाठी सकारात्मक पावले उचलण्‍यास सुरुवात केली आहे. त्यानुसार १० हजार लशी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
.................................
कोट
लम्पी स्कीन या आजाराबाबत उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये निरोगी जनावरांचे लसीकरण महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून १० हजार लशींची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच याव्यतिरिक्त १० हजार लशी सरकारकडून प्राप्त होणार आहे. अधिक मागणी केल्यास त्यादेखील पुरविण्यास सरकारकडून सहमती दर्शविली आहे.
- डॉ. समीर तोडणकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. ठाणे

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95903 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..