मध्य रेल्वेच्या १० गणपती विशेष लोकल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वेच्या १० गणपती विशेष लोकल
मध्य रेल्वेच्या १० गणपती विशेष लोकल

मध्य रेल्वेच्या १० गणपती विशेष लोकल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ६ : लालबाग गणेशगल्ली या विभागातील गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आणि विसर्जनानिमित्त रात्री उशिरापर्यंत गणेशभक्त बाहेर असतात. या गणेशभक्तांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेकडून ९ सप्टेंबरच्या रात्रीपासून ते १० सप्टेंबरपर्यंत १० विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेने यापूर्वीच ८ विशेष लोकल चालविण्याची घोषणा केली आहेत. त्यात मध्य रेल्वेनेही विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतल्याने भाविकांना दिलासा मिळणार आहे.

सीएसएमटी विशेष लोकल कल्याण येथून मध्यरात्री १२.०५ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे मध्यरात्री १.३० वाजता पोहोचेल. सीएसएमटी विशेष ठाणे लोकल ठाणे येथून मध्यरात्री १ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे मध्यरात्री २ वाजता पोहोचेल. सीएसएमटी विशेष ठाणे येथून २ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे ३ वाजता पोहोचेल. डाऊन दिशेने कल्याण विशेष लोकल सीएसएमटी येथून मध्यरात्री १.४० वाजता सुटेल आणि कल्याण येथे मध्यरात्री ३.१० वाजता पोहोचेल. ठाणे विशेष लोकल सीएसएमटी येथून मध्यरात्री २.३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे मध्यरात्री ३.३० वाजता पोहोचेल. कल्याण विशेष लोकल सीएसएमटी येथून मध्यरात्री ३.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे पहाटे ४.५५ वाजता पोहोचेल; तर हार्बर मार्गावर सीएसएमटीहून मध्यरात्री १.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे मध्यरात्री ०२.५० वाजता पोहोचेल. पनवेल विशेष लोकल सीएसएमटी येथून ०२.४५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95915 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..