पावात आढळली उंदरांची विष्ठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावात आढळली उंदरांची विष्ठा
पावात आढळली उंदरांची विष्ठा

पावात आढळली उंदरांची विष्ठा

sakal_logo
By

पेण, ता. ६ (वार्ताहर) : शहरातील एका हॉटेलमध्ये नाष्टा करताना पावात उंदरांची विष्ठा आढळून आल्याने संबंधित व्यक्तीने चौकशी केली असता ज्या बेकरीतून पाव आला तेथे अस्वच्छता आढळली. याबाबत अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी बेकरीची पाहणी करून उपाययोजना करीपर्यंत उत्पादन बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पेण शहरातील रामवाडी येथे असणाऱ्या बेकरीमधून शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी पाव विकले जातात. पावात उंदरांची विष्ठा आढळल्यावर अधिकारी व तक्रारदार यांनी बेकरीची पाहणी केली असता त्या ठिकाणी अस्वच्छता, उंदरांचा वावर अशी स्थिती आढळून आली. पाहणीनंतर अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी परवान्याची तपासणी केली. बेकरीच्या बांधकामामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले असून तोपर्यंत बेकरीतील उत्पादन बंद ठेवण्याचेही निर्देशही दिल्याचे दराडे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95920 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..