विसर्जनप्रसंगी एकाच कुटुंबातील दोघा तरुणांचा बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विसर्जनप्रसंगी एकाच कुटुंबातील दोघा तरुणांचा बुडून मृत्यू
विसर्जनप्रसंगी एकाच कुटुंबातील दोघा तरुणांचा बुडून मृत्यू

विसर्जनप्रसंगी एकाच कुटुंबातील दोघा तरुणांचा बुडून मृत्यू

sakal_logo
By

पनवेल, ता. ६ (वार्ताहर) : पनवेलमधील कोप्रोली गावाजवळील गाढी नदीपात्रात गणपती विसर्जनासाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील दोघा तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. ५) रात्री घडली. विक्रम दिगंबर जमादार (वय २१) आणि राजशेखर माणीक जमादार (वय २०) अशी या तरुणांची नावे असून यातील विक्रमचा मृतदेह मंगळवारी सकाळी; तर राजशेखरचा सायंकाळी पोलिसांच्या हाती लागला.
एकाच कुटुंबातील तरुणांचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत दोघेही तरुण एकाच कुटुंबातील असून ते पनवेल येथील कमांडर रेनाई या सोसायटीत राहत होते. विक्रम आणि राजशेखर हे दोघेही सोमवारी रात्री नातेवाईक व मित्रमंडळींसह आपल्या घरातील गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेले होते. आपल्या घरातील गणपतीचे विसर्जन केल्यानंतर ते कमांडर सोसायटीच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी पुन्हा नदीपात्रात गेले होते. या वेळी विसर्जनासाठी त्यांच्यासोबत पाच-सहा तरुण पाण्यात उतरले होते. पाण्यात उतरलेल्या एकाला खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी दुसरा पाण्यात उतरला; मात्र दोघेही नदीच्या पाण्यात बुडाले. पनवेल तालुका पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95925 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..