अनंत चुर्तदशीला एपीएमसी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनंत चुर्तदशीला एपीएमसी बंद
अनंत चुर्तदशीला एपीएमसी बंद

अनंत चुर्तदशीला एपीएमसी बंद

sakal_logo
By

वाशी, ता. ६ (बातमीदार) ः मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा, फळे, भाजीपाला व मसाला मार्केट अशी पाचही मार्केट अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे गणेश विसर्जनाच्या दिवशी बंद राहणार आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी एपीएमसी बाजार बंद राहणार असल्यामुळे गुरुवारी खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. भाजीपाला मार्केट शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यत सुरू राहणार असून त्यानंतर दिवसभर बंद राहणार आहे. त्यामुळे भाजी मार्केटमध्ये गर्दी होणार नसल्याचे विश्वास भाजीपाला बाजारांचे संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाजार बंद राहणार आहे. मात्र फारसा परिणाम होणार नाही, असे कांदा-बटाटा मार्केटचे संचालक अशोक वाळुंज यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95927 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..