‘तारागिरी’ युद्धनौकेची ११ सप्टेंबरपासून निर्मिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘तारागिरी’ युद्धनौकेची ११ सप्टेंबरपासून निर्मिती
‘तारागिरी’ युद्धनौकेची ११ सप्टेंबरपासून निर्मिती

‘तारागिरी’ युद्धनौकेची ११ सप्टेंबरपासून निर्मिती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ६ : माझगाव डॉकच्या माध्यमातून तिसऱ्या युद्धनौकेच्या निर्मिती प्रकल्पाला येत्या ११ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. प्रोजेक्ट ‘१७ अ’ अंतर्गत तारागिरी प्रकल्पाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पातील पोलादी कण्याचे (कील) काम हे १० सप्टेंबर २०२० मध्ये सुरू करण्यात आले होते; तर येत्या ऑगस्ट २०२५ मध्ये ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करणे अपेक्षित आहे. याआधीच माझगाव डॉकने ‘उदयगिरी’ आणि ‘सुरत’ या युद्धनौकांचे जलावतरण केले होते.

संपूर्ण तारागिरीचे काम हे ‘इंटिग्रेटेड कंस्ट्रक्शन मेथडॉलॉजी’ने करण्यात येत आहे. त्यामध्ये ब्लॉकची निर्मिती विविध ठिकाणी करूनच माझगाव डॉक येथे सुटे भाग जोडण्यात येणार आहेत. जवळपास ३५१० टन वजनाची युद्धनौका नौदलाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. ‘ब्युरो ऑफ नेव्हल डिझाईन’च्या माध्यमातून युद्धनौकेचे डिझाईन करण्यात आले आहे. एमडीएलच्या माध्यमातून डिटेल डिझाईन आणि युद्धनौका बांधणीचे काम हे वॉरशीप ओव्हरसिईंग टीमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दोन गॅस टर्बाईन्स तसेच २ डिझेल इंजिनच्या माध्यमातून २८ नॉटिकल मैलचा वेग गाठणे या युद्धनौकेला शक्य होणार आहे.

युद्धनौकेची वैशिष्ट्ये
‘तारागिरी’ युद्धनौकेसाठी कार्बन मायक्रो अलॉय स्टीलचा वापर करण्यात येणार आहे. तसेच शस्त्रे, सेन्सर, ॲडव्हान्स ॲक्शन इन्फॉर्मेशन सिस्टिम, ‘सर्फेस टू सर्फेस’ अशा मिसाईल सिस्टिम, गनफायर सपोर्ट, रॉकेट लॉंचर आदी वैशिष्ट्येही यामध्ये देण्यात आले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95928 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..